Pune : महापालिकेच्या विरोधीपक्ष नेतेपदी कोण ? राष्ट्रवादी मध्ये चुरस 

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेचे विद्यमान विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर महापालिकेतील विरोधीपक्ष नेते पदाची जबाबदारी कोणावर पडणार यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. हे पद आपल्याला मिळावे, यासाठी गेल्या आठवड्यात तीन नगरसेवकांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. पक्षाच्या नगरसेवकांनी सर्वानुमते एक नाव निश्चित करून द्यावे, त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे.
राष्ट्रवादीची सत्ता असताना महापौर, उपमहापौर तसेच स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविलेल्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन या पदाची माळ आपल्या गळ्यात पदवी यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

शहराध्यक्ष पदाची जबाबदारी तुपे यांना देताना विरोधी पक्षनेते बदलण्याचे संकेत पक्षाच्या नेत्यांना दिले होते. ही जबाबदारी स्वीकारून दोन महिने झाले आहेत. त्यामुळे आता विरोधी पक्षनेता बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे.
या पदासाठी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी उपमहापौर दिलीप बराटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे, विशाल तांबे यांची नावे आघाडीवर आहेत. या इच्छुकांनी गेल्या आठवड्यात अजित पवार यांच्यासह पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.