WHO ON CORONA : कोरोनावर ‘कदाचित’ प्रभावी औषध सापडणार नाही, जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली चिंता

कोरोनावर अद्याप बाजारात कोणतीही खात्रीलायक लस उपलब्ध नाही. : Coronavirus may not find effective medicine, World Health Organization

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू विरुद्ध प्रभावी लस शोधण्याचे काम सुरु आहे. मात्र आत्तापर्यंत या विषाणूंवर प्रभावी औषध सापडलेले नाही, कदाचित ते कधीच सापडू शकत नाही, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस एडहनॉम गिब्रयेसॉस यांनी व्हर्चूअल पत्रकार परिषदेत दिली.

जागतिक आरोग्य संघटनेने एक दिवस आधी असे म्हटले होते की, कोरोनाचे संकट आणखी अधिक काळासाठी आपल्याबरोबर राहणार आहे. त्यात संचालकानी केलेल्या या विधानामुळे आणखी चिंता वाढणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

जगभरात कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लस तयार केल्या जात आहेत आणि चाचण्याही केल्या जात आहेत. असे असले तरी या आजारावर अद्याप बाजारात कोणतीही खात्रीलायक लस उपलब्ध नाही.

दरम्यान, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला आँक्सफर्ड विद्यापीठ-अँस्ट्रा झेनेका सोबत देशात कोविड विरोधी ‘कोव्हिडशिल्ड’ या लसीच्या क्लिनिकल ट्रायल्सच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी परवानगी दिली आहे.

या परवानगीमुळे लस निर्मितीच्या प्रक्रियाला वेग येणार असल्याचे सांगितले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.