Corona Medicine Alert: कोरोनाबाधितांवर हायड्रोक्सिक्लोरोक्वाईनच्या वापरावर WHO ची तूर्त बंदी

WHO Stop hydroxychloroquine trial in Coronavirus patients

एमपीसी न्यूज- जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना विषाणूवरील संभाव्य उपचारासाठी प्रभावी मानल्या जाणाऱ्या हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन औषधाच्या वापरावर बंदी घातली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन हे मलेरियाच्या रुग्णांवरील उपचारासाठी वापरले जाते.

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडनोम घेबियस यांनी एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले की, मागील आठवड्यात प्रकाशित झालेल्या लँसेटच्या एका अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-19 बाधितांवर या औषधाचा वापर केल्यामुळे मृत्यूची शक्यता वाढू शकते. त्यामुळे डब्ल्यूएचओने चाचण्या बंद केल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव याची समीक्षा केली जात आहे.

ट्रेडोस यांच्या मते, पूर्वी डेटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्ड सेफ्टी डेटाचे समीक्षण करेल. चाचणीचे उर्वरित भाग सुरुच राहतील.

अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्णांच्या उपचारासाठी हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन किंवा क्लोरोक्वाईनच्या वापरावरुन विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना डब्ल्यूएचओ हेल्थ इमर्जन्सी प्रोग्रामचे कार्यकारी संचालक डॉ. मायकल रयान यांनी दोन्ही औषधांना पूर्वीपासून अनेक आजारांसाठी परवाना मिळाला असल्याचे सांगितले.

दरम्यान, क्लोरोक्वाईन आणि हायड्रोक्सिक्लोरोक्वाईनमुळे कोविड-19 च्या रुग्णांना फायदा होत नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे याच्या वैद्यकीय चाचणीशिवाय वापरावर बंदी घातली पाहिजे, लँसेटच्या अहवालात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.