Bhosari: होलसेल भाजी विक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना बेदम मारहाण

Wholesale vegetable vendors beat up retailers near brohadewadi pcmc

एमपीसी न्यूज- किरकोळ भाजी विकणाऱ्या भाजी विक्रेत्यांना 20 ते 25 होलसेल भाजी विक्रेत्यांनी मारहाण केली. तसेच किरकोळ भाजी विक्रेत्यांकडील भाजी रस्त्यावर फेकून दिली. ही घटना शनिवारी (दि.30) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बोऱ्हाडेवाडी ते जाधववाडी रस्त्यावर घडली.

सुनिता मुमताज सिद्धिकी (वय 51, रा. धायकरवाडी, डुडुळगाव) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे फिर्यादी सुनिता त्यांचा लहान मुलगा आरिफ आणि मोठा मुलगा आसिफ तसेच इतर भाजी विक्रेते बोर्‍हाडेवाडी ते जाधववाडी रोडवरील स्टेटस स्वीट समोर भाजी विकत होते.

त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे होलसेल दरात भाजी विक्री करणार्‍या 20 ते 25 जणांनी फिर्यादी यांच्या जवळ येऊन ‘रस्त्यावर भाजी का विकता’ असे म्हटले.

तसेच आरोपींनी काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादी यांचा माल रस्त्यावर फेकून दिला. आसिफ यांच्या हातातील मोबाईल रस्त्यावर फेकून देऊन मोबाईल फोनचे नुकसान केले.

तसेच ‘पोलिसात तक्रार दिल्यास तुम्हाला बघून घेऊ’ अशी धमकी देखील आरोपींनी फिर्यादी यांना दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.