BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : प्रात:विधीसाठी गेलेल्या महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज – प्रातःविधीसाठी गेलेल्या महिलेवर तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. ही घटना रविवारी (दि. 8) पहाटे तळेगाव दाभाडे येथे घडली.

याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आदेश नागनाथ गवलवाड (रा. आचेगाव ता देवलूर जि. नांदेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तळेगाव दाभाडे येथील अमराई हॉटेलच्या शेजारी असलेल्या माळावर रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास प्रात:विधीसाठी गेली. त्यावेळी आरोपीने पीडित महिलेला व तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव-दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3