Dasara Melava : दसरा मेळावा कुणाचा? शिंदेंचा की ठाकरेचा? वाचा आढळराव पाटील काय म्हणाले?

एमपीसी न्यूज : शिवसेना आणि दसरा मेळावा (Dasara Melava) हे दरवर्षीचे समीकरण आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेकडून भव्य असा दसरा मेळावा आयोजित केला जातो. वर्षानुवर्षाची ही परंपरा आहे. या माध्यमातून शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन केले जाते. यंदा मात्र वातावरण काहीसे वेगळे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गट. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न पडला असतानाच आता दसरा मेळावा कुणाचा असा देखील प्रश्न पडला आहे. कारण शिंदे गटाचे नेतेही दसरा मेळाव्याबद्दल दावे करताना दिसत आहे.

Chaturshrungi Police : मयत पतीला जिवंत दाखवून पेन्शन घेणाऱ्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना देखील याविषयी विचारले असता त्यांनी दसरा मेळावा शिवसेनेचा होणे अपेक्षित आहे असे म्हटले. सोबतच या (Dasara Melava) मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण व्हावं अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांचे भाषण व्हावं अशी अनेकांची इच्छा असल्याचेही ते म्हणाले. परंतु, यावर अद्याप निर्णय यायचा आहे, असं सांगत त्यांनी या मुद्द्याला बगल देण्याचाही प्रयत्न केलाय. आढळराव पाटील हे आज पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी हे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.