_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Chakan : ‘इथे का थांबलास, तुला इंग्रजीत सांगू का’, असे म्हणत एकाला बेदम मारहाण

'Why did you stop here, can I tell you in English', beating one person to death : पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली

एमपीसी न्यूज – गिरणीत दळण आणण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला तिथे अगोदरपासून वाद सुरु असलेल्या तिघांनी ‘तू इथे का थांबलास, तुला इंग्रजीत सांगू काय’ असे म्हणत दम दिला. तसेच बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 26) रात्री सव्वा आठच्या सुमारास कुरुळी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

राजेंद्र पांडुरंग भदाले, राहुल रावसाहेब भदाले, रितेश संतोष भदाले (सर्व रा. कुरुळी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सचिन अर्जुन सोनवणे (वय 40, रा. सोनवणेवस्ती, कुरुळी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनवणे हे रविवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास कुरुळी येथील राजेंद्र भदाले यांच्या पिठाच्या गिरणीत दळण दळण्यासाठी गेले होते. तिथे गिरणीतील कामगार आणि इतर ग्राहकांमध्ये अगोदरपासून वाद सुरु होता.

_MPC_DIR_MPU_II

फिर्यादी सोनवणे यांनी दळण गिरणीत ठेऊन तेही तिथे थांबले. त्यामुळे आरोपी राजेंद्र याने ‘तू इथे का थांबलास, तुला इंग्रजीत सांगू काय’ असे म्हणत सोनवणे यांना दम दिला.

त्यानंतर आरोपींनी सोनवणे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी पाठीत, पोटात आणि डोक्यात बेदम मारहाण केली.

चाकण पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 324, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.