Pune News : पुण्यातील कर बुडव्या लोकांना दिलासा का देताय ? – उज्ज्वल केसकर

एमपीसी न्यूज – पुण्यातील कर बुडव्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या सवलतींवरून माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी महापालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे. महापालिका अशा नागरिकांना दिलासा का देताय ? असा सवालही केसकर यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत केसकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. सामान्य नागरिकांना त्यांनी कर भरला नाही तर त्यांच्या घरासमोर बँड वाजवून त्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढणारी मनपा “हतबल” झाली आहे का ?, असेही केसकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

करबुडव्यांना कोणतीही सवलत देऊ नये उलट त्यांच्या घरासमोर नियमात बसेल अश्या डेशीबलचा DJ लावावा. त्यांच्या मालमत्तेवर मनपाचे नाव लावा, त्यांच्या नावाची प्रसिद्धी वृत्तपत्रे आणि वेबसाईटवर करा. करबुडव्या लोकांना कोणताही दिलासा देऊ नका.

प्रामाणिक करदात्यांना दिलासा द्यावा. करबुडव्यांना दिलासा देऊन मनपाची आर्थिक परिस्थिती बिघडू नका. त्यांच्यावर कडक कार्यवाही कराया;अन्यथा करबुडव्या विरोधात लोकायुक्त आणि हायकोर्टात दाद मागावी लागेल, असा इशाराही उज्ज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी दिला आहे.

निवेदनाच्या प्रति पालकमंत्री, प्रधानसचिव, कार्यालय अधीक्षक, लोकायुक्त कार्यालय, कर आकारणी आणि कर संकलन प्रमुख, पुणे मनपा यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.