WI Declared Team: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर

WI Declared Team: West Indies squad announced for Test series against England सर्व खेळाडूंना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. आता याच खेळाडूंमधून खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने संघ जाहीर केला आहे. कोरोनाचा धोका असल्याने सुरुवातीला या मालिकेत सहभागी होण्यास नकार देणाऱ्या शॅनन गॅब्रियल यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. 14 खेळाडू व 10 राखीव खेळाडू असा संघ इंग्लंडमध्ये आधीच दाखल झाला होता.

सर्व खेळाडूंना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. आता याच खेळाडूंमधून खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

जाहीर करण्यात आलेला वेस्ट इंडिज संघ :

जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, शाई होप, शेन डॉरिच, रोस्टन चेस, शेमार ब्रूक्स, रहकीम कॉर्नवॉल, एन्कुरमा बोनेर, अल्झारी जोसेफ, चेमार होल्डर, जॉन कॅम्पबेल, रेमॉन रेफर, केमार रोच, जेर्मिन ब्लॅकवूड, शॅनन गॅब्रियल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.