Pune News : दारूसाठी पैसे दिली नाही म्हणून पत्नीला मारहाण, पती विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे पतीने पत्नीला घरातील लाटण्याने बेदम मारहाण केली. चतु:शृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वडारवाडी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नामदेव तुकाराम विटकर (वय 43) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी आणि आरोपी वडारवाडीत. राहतात. 10 फेब्रुवारीच्या रात्री आरोपीने फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु तिने पैसे नाहीत असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपी निर्यातदार शिवीगाळ करत हाताने बेदम मारहाण केली. फिर्यादीने हात धरला असता आरोपीने घरातील लाकडी लाटणे घेऊन तिच्या उजव्या हातावर जोरात मारणे. यामध्ये फिर्यादीच्या करंगळीचे हाड फॅक्चर झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चतु:शृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.