Akurdi Crime News : पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पत्नीची आत्महत्या

पतीच्या अनैतिक संबंधांमुळे जीवन संपवत असल्याचा चिठ्ठीत उल्लेख

एमपीसी न्यूज – आकुर्डीतील 33 वर्षीय महिलेनं आत्महत्या केली. या महिलेचा इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला त्यावेळी तिच्याजवळ एक चिठ्ठी सापडली. पतीच्या अनैतिक संबंधांमुळे जीवन संपवत असल्याचा उल्लेख या चिठ्ठीत आढळला असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार (दि.20) पंचतारानगर, आकुर्डी हा प्रकार उघडकीस आला. 

रुपाली जयंत कांबळे (वय 33, पंचतारानगर, आकुर्डी) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे.  याप्रकरणी महिलेचा पती जयंत एकनाथ कांबळे (वय 42, रा. पंचतारानगर, आकुर्डी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश भारत मोरे यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विवाहित महिलेनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला उपचारासाठी आकुर्डी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर महिलेचा इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला त्यावेळी तिच्याजवळ एक चिठ्ठी सापडली.

या चिठ्ठीत ‘माझ्या नव-याचे बाहेरील एका बाईशी संबंध होते, म्हणून मी स्वतःला संपवत आहे. माझी शेवटची इच्छा आहे की, माझं सर्व काही असेल ते विधवा म्हणून करावे’ असा मजकूर लिहिलेला होता. अनैतिक संबंध ठेऊन पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आहेर करत आहेत.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.