Chakan : पत्नीचा विनयभंग, पतीला मारहाण; सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – रस्त्याने जात असलेल्या महिलेची छेड काढून तिचा विनयभंग केला. तसेच तिला दगडाने मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या पतीला देखील मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 25) दुपारी तीन ते सायंकाळी सहाच्या सुमारास खराबवाडी येथे घडली.

शाम कड (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याचे पाच साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी महिला खराबवाडी येथील मनोज खाराबी यांच्या कार्यालयाच्या मागील बाजूने रस्त्याने जात होत्या. त्यावेळी आरोपी शाम याने त्यांना आवाज दिला. फिर्यादींनी त्याला प्रतिसाद दिला नाही. यावरून शाम याने त्यांच्याशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. तसेच शिवीगाळ करून दगडाने पोटात मारले.

या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी महिलेचे पती शाम याच्याकडे गेले असता आरोपी शाम आणि त्यांच्या पाच साथीदारांनी मिळून पतीला देखील लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड व फायबरच्या पाईपने मारहाण केली. यामध्ये फिर्यादीचे पती जखमी झाले. मारहाण केल्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या पतीला ‘तुला सोडणार नाही’ अशी धमकी दिली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.