Wakad : जेवणातून गोळ्या देऊन पत्नीचा गर्भपात

पती विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – माहेरहून पैसे आणण्यासाठी पतीने पत्नीचा मानसिक आणि शारिरीक छळ केला. यामुळे पत्नीचा गर्भपात झाल्याची घटना रहाटणी येथे घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 28) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादी महिलेचा पती संदीप अरूण पवार (रा. नखाते नगर, रहाटणी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2017 मध्ये फिर्यादी महिला आणि संदिप यांचा विवाह झाला. लग्नानंतर संदीप याने पत्नीला वारंवार माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. महिलेने पैसे आणण्यासाठी नकार दिल्यास तिला वारंवार मारहाण तसेच मानसिक छळ केला. यानंतर महिला गर्भवती असल्याचे समजताच संदीप याने जेवणातून गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. असे पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पतिविरोधात महिलेचा छळ व गर्भपाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप पतीला अटक झालेली नसून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.