Chikhali : पतीच्या प्रेमसंबंधाबाबत विचारणा केल्याने पत्नीचा छळ

एमपीसी न्यूज – पतीचे त्याच्या कार्यालयातील एका महिलेशी प्रेमसंबंध जुळले. त्याबाबत विचारणा करणा-या पत्नीला पतीने मारहाण केली. तसेच या प्रकरणावर सासरच्या मंडळींनी पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रुपीनगर तळवडे येथे फेब्रुवारी 2018 ते जून 2019 या कालावधीत घडली.

शाही फकीर ओव्हाळ (वय 36), फकीर ज्ञानोबा ओव्हाळ (वय 63), अप्रुगा फकीर ओव्हाळ (वय 60, सर्व रा. रुपीनगर, तळवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 33 वर्षीय पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि शाही हे पती-पत्नी आहेत. शाही ओव्हाळ याचे त्याच्या कंपनीतील महिलांशी प्रेमसंबंध होते. याबाबत पत्नीने त्याच्याकडे विचारणा केली. शाही याने पत्नीला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार सासू-सास-यांना सांगितला असता त्यांनी देखील या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. सासरच्या मंडळींनी पीडित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करून घरातून बाहेर काढले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like