Technology News : विकीपीडिया झाले वीस वर्षांचे

एमपीसी न्यूज: विकीपीडिया या प्रसिद्ध संकेतस्थळाला (दि. 15) रोजी 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2001 साली जिमी वेल्स आणि लॅरी सैंगर या दोघांनी मिळून विकीपीडिया सुरू केले. हे एक असे संकेतस्थळ आहे जिथे वापरकर्ता कोणताही लेख, कोणतीही माहिती एडिट करून प्रकाशित करू शकतो.

ही 20 वर्षे साजरी करण्यासाठी विकीपिडीयाने 20.wikipedia.org हे खास संकेतस्थळ लॉंच केले. यानिमित्ताने विकीपीडियातर्फे युट्यूब आणि फेसबुकवर त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाची, महत्वाच्या घटनांची माहिती देण्यासाठी लाईव्ह कार्यक्रम दाखवला गेला.

या संकेतस्थळाचे पहिले नाव न्यूपीडिया असे होते. न्यूपीडियामध्ये फक्त तज्ञ लेखकांनाच लेख लिहण्याची परवानगी होती. यानंतर पुढे विकीपीडिया लॉंन्च झाले. विकीपीडियाच्या सुरवातीच्या वेळी सर्व वापरकर्त्यांना माहिती एडीट करण्याची परवानगी नव्हती. परंतु काही काळाने सर्वांना माहिती एडिट करण्याची परवानगी दिली गेली.

सुरवातीला फक्त इंग्रजी भाषेमध्ये असणारे विकीपीडिया आज 300 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. विकीपीडियामध्ये हिंदी भाषेचा 2003 मध्ये समावेश केला गेला. दर महिना 2,80,000 च्या आसपास लोकं विकीपीडियावरील माहिती एडिट करत असतात. विकीपीडियाला वापरकर्ता पैसे डोनेट करू शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.