Pune – वन्यजीव छायाचित्रांचे 25 जानेवारीपासून प्रदर्शन

एमपीसी न्यूज – वन्यजीव छायाचित्रांचे 25 जानेवारीपासून तीन दिवशीय प्रदर्शन कल्ला-मोहल्ला यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले आहे. वनाधिकारी रंगनाथ नाईकडे यांच्या हस्ते या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दि. 25 ते 27 जानेवारी 2019 या कालावधीत टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेसमोरील रिवा बिल्डिंगच्या प्रांगणात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

रिवा, कल्ला-मोहल्ला आणि ऍडव्हेंचर मंत्रा यांच्या संयुक्त विद्यमाने युवा छायाचित्रकारांनी काढलेल्या वन्यजीव छायाचित्रांचे हे प्रदर्शन असणार आहे. तीन दिवस चालणारे हे प्रदर्शन रोज सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन भारतीय वन सेवा अधिकारी रंगनाथ नाईकडे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 25) जानेवारी 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे.
प्रतीक जोशी, विराज सिंग, ईशान बिदये, मंदार मोटे या युवा वन्यजीव छायाचित्रकारांनी ही छायाचित्रे टिपलेली आहेत. या चारही छायाचित्रकारांनी काढलेली जवळपास 30 पेक्षा अधिक छायाचित्रे येथे पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर तनय गुमास्ते या चित्रकाराने रेखाटलेली चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.

प्रदर्शनाची वेळ : शुक्रवारी (दि. 25) ते रविवारी (दि.27) रोज सकाळी 10 ते रात्री 9
ठिकाण : रिवा बिल्डिंग, ग्राहक पेठेसमोरील, टिळक रोड पुणे . (प्रवेश विनामूल्य)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.