Wildlife Week : वन्यजीव सप्ताहा निमीत्त विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या घुबड या पक्षाबद्दल च्या श्रद्धा व अंधश्रद्धा

एमपीसी न्यूज : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, वनविभाग पुणे वनपरिक्षेत्र शिरोता व अविज फाउंडेशन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमानाने वन्य जीव सप्ताह साजरा केला जाणार आहे.(Wildlife Week) याच कार्यक्रमानिमीत्त शनिवारी (दि.1) न्यू इंग्लिश स्कूल भोयरे मावळ येथे विद्यार्थ्यांनी घुबड या पक्षाबद्दल असलेल्या श्रद्धा व अंधश्रद्धा जाणून घेतल्या.

या वन्यजीव सप्ताह 1 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत साजरा केला जाणार असून या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी पक्षी मित्र अविनाश नागरे यांच्या व्याख्यानातून घुबड या पक्षाच्या जिवनशैलीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या कार्यक्रमास साठी वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सुशील सुशील मंतावार, वनपरीक्षक मंडळ अधिकारी वाहनगाव एस एस बुचडे , सीएनएस मिलके वनरक्षक किवळे , वनरक्षक खांडी एच एस तांबे,(Wildlife Week) वनरक्षक पिंपरी के एस पाटील, तसेच निसर्ग मित्र महेश परदेशी आनंद नाईक, चिधू अजिवले, ग्रामस्थ शाळेतील प्राध्यापक मोरे, शिक्षक  केंद्र कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व अविज फाउंडेशन निसर्ग संवर्धन व संगोपन या विषयावरती मावळ तालुक्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात काम करत आहे याही वर्षी दीपक फल्ले यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

Tata Motor’s : टाटा मोटर्सच्या Q2FY23 गाड्यांच्या विक्रीत 42 टक्क्यांनी वाढ

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी आणि प्रशांत ता ये यांनी केले त्यानंतर रोटरी क्लब तळेगाव सिटी पर्यावरण प्रमुख व अविस फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय अविनाश नागरे यांनी घुबडा विषयी श्रद्धा व अंधश्रद्धा व घुबडांच्या जीवनशैली विषयी सविस्तर मार्गदर्शन केले व माहितीपट सादर केला.

या कार्यक्रमाचा समारोप सर्वांच्या आभार प्रदर्शनाने झाला व सामूहिक रित्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम ही घेण्यात आला या कार्यक्रमास साडेतीनशे ते चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.(Wildlife Week)  घुबडांविषयीचा अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्या विषयाचे संपूर्ण माहिती देण्यात आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.