Talegaon-Dabhade : वन्यजीव सप्ताहानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयात प्रशिक्षण शिबीर

एमपीसी न्यूज : वन्यजीव सप्ताहानिमित्त पुणे वन विभाग, पुणे वडगाव मावळ, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि इंद्रायणी विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यामाने (Talegaon-Dabhade) ‘वन्यजीवांचे महत्त्व आणि संवर्धन कसे करायचे?’ यावर इंद्रायणी महाविद्यालयात तळेगाव दाभाडे येथे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

इंद्रायणी महाविद्यालयाचे सचिव चंद्रकांत शेटे, प्राचार्य संभाजी मलगे, वडगाव मावळ वन परीक्षेत अधिकारी हनुमंत जाधव व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांनी दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले. इंद्रायणी महाविद्यालयाच्या 250 विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले होते.

Pratibha institute : प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये हिंदी दिनानिमीत्त सप्ताह साजरा

या वेळी वडगाव मावळ वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव, वनपाल एस. ढेंबरे, एस. चुटके, डी. ढोणे आणि इतर वनरक्षक तसच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, गणेश निसाळ, विनय सावंत, भास्कर माळी, केतिका कासेटवार, रुजुत्ता काटे, सत्यम सावंत, श्रेयस कांबळे, रोहन ओव्हाळ, जिगर सोलंकी, अमित गुरव उपस्थित होते.(Talegaon-dabhade) वन्यजीवांचे संवर्धन व त्याचे महत्व याची महिती जिगर सोलंकी आणि गणेश निसाळ यानी दिली. हनुमंत जाधव यांनी वन कायदे व स्थानीक वन्यजीव बद्दल महिती दिली. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची माहिती संस्थेचे आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष गणेश निसाळ यांनी दिली. डॉक्टर प्रमोद बोराडे यांनी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन केले. डॉ. रोहित नागलगाव यांनी महाविद्यालयाच्या वतीने सर्वांचे  आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.