Dehu Road : देहूरोडचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश होणार?

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश होण्याची शक्यता आहे. कारण बोर्डाचे क्षेत्र, लोकसंख्या, यांचा समावेश महापालिकेत (Dehu Road) झाल्यानंतर शहराची लोकसंख्या कितीने वाढणार याबाबतचा तपशील तातडीने राज्य शासनाने महापालिका आयुक्तांकडून मागवला आहे. त्यामुळे देहूरोडचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश होऊ शकतो.

राज्यात देहूरोड, पुणे, खडकी, देवळाली (नाशिक), अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर व कामटी (नागपूर) असे सात कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. या बोर्डाची मुदत संपल्यानंतर येथे निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्याची प्रक्रिया सुरू असतानाच अचानक निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर आता हे कॅन्टोन्मेंट बोर्ड रद्द नजिकच्या महापालिका क्षेत्रात समावेश करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठीचा अभिप्राय राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने संबंधित महापालिकांकडून मागविण्यात आला आहे.

Maval :  अद्यात वाहनाच्या धडकेत जखमी सांबराचा मृत्यू

बोर्डाचे क्षेत्र, लोकसंख्या, यांचा समावेश महापालिकेत झाल्यानंतर शहराची लोकसंख्या कितीने वाढणार याबाबतचा तपशील तातडीने मागवला आहे. (Dehu Road) नगरविकास विभागाच्या उपसचिव सुशिला पवार यांनी यासंबंधीचे पत्र 27 मार्च रोजी पाठविले आहे. यासाठीचा अभिप्राय तात्काळ देण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारने याबाबत आधी दिलेल्या पत्राचा हवाला यात देण्यात आला आहे.

या प्रस्तावानुसार कोणते कॅन्टोंन्मेंट बोर्ड कोणत्या महापालिकेत समाविष्ट  होऊ शकतात

पुणे कॅन्टोंन्मेंट- पुणे महानगरपालिका
खडकी कॅन्टोनेंट- पुणे महानगरपालिका
देहूरोड कॅन्टोन्मेंट- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड- नाशिक महानगरपालिका
अहमदनगर कॅन्टोंन्मेंट बोर्ड (भिंगार)- अहमदनगर महानगरपालिका
छत्रपती संभाजीनगर  कॅन्टोन्मेंट बोर्ड- छत्रपती संभाजीनगर   महानगरपालिका
कामठी कॅन्टोन्मेंट बोर्ड- नागपूर महानगरपालिका

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.