Pimpri : ज्येष्ठ नागरिकांना शहरात कार्यालय देणार – महापौर जाधव 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात स्वतंत्र कार्यालय देण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक धोरणांतर्गत आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. यासह ज्येष्ठांना विविध सोयी-सुविधा देण्यात येणार असल्याचे, महापौर राहुल जाधव यांनी सांगितले. 

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, सभागृह नेते एकनाथ पवार, शिक्षण समिती अध्यक्षा प्रा. सोनाली गव्हाणे, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, उषा मुंढे, आरती चोंधे, निर्मला कुटे, साधना मळेकर, अश्‍विनी जाधव, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रविण आष्टीकर व शहरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाची समाजाला नितांत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या विविध मागण्यांपैकी बहुतांशी मागण्या महापौर जाधव यांनी मान्य केल्या. तर काही निर्णय धोरणात्मक असल्याने त्यावर सभागृहाची मान्यता घ्यावी लागेल, असे यावेळी स्पष्ट केले. तसेच काही उपक्रम ‘सीएसआर’ अंतर्गत राबविण्याचे आश्‍वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.