Pune News: रस्त्यांबाबत बैठक घेऊन कार्यवाही करणार- आयुक्त विक्रम कुमार

नगर रस्त्यासह वडगाव शेरी, विमाननगर, धानोरी या भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहेत. या भागातील अनेक रस्ते विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटत नाही.

एमपीसी न्यूज – वडगाव शेरीतील रखडलेल्या रस्त्यांची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह आमदार सुनील टिंगरे यांनी बुधवारी पाहणी केली. स्थानिक अधिकार्‍यांनी यासंबधीची कल्पना न देता आयुक्तांनी थेट प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रत्येक रस्त्यांची माहिती घेतली. याबाबत लवकरच सर्व विभागांची बैठक घेऊन रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन आयुक्तांनी दिले.

नगर रस्त्यासह वडगाव शेरी, विमाननगर, धानोरी या भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहेत. या भागातील अनेक रस्ते विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटत नाही.

त्यात प्रामुख्याने शिवणे-खराडी रस्त्यासह विविध रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार टिंगरे यांनी केलेल्या मागणीनुसार पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली होती.

बुधवारी सकाळीच आयुक्त कुमार यांनी आमदार टिंगरे यांच्या समवेत प्रत्येक रस्त्यांची पाहणी केली. यावेळी कल्याणीनगरमध्ये भूसंपादनाभावी रखडलेल्या नदीकाठचा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला भेट देऊन येथील प्रलंबित विकासकामांची माहिती घेतली.

त्यानंतर त्यांनी विमाननगरमधील कोनार्क नगर येथील अनेक वर्षे प्रलंबित असलेला रेड्डी ढाबा ते सीसीडी चौक रस्ता, फाईव्ह नाईन चौक ते धानोरी जकात नाका रस्ता, धानोरीतील पॅरेडीयम ते सेव्हन हेवन सोसायटी रस्ता, धानोरी जकात नाका ते डीवाय पाटील कॉलेजकडे जाणारा डीपी रस्ता, विश्रांतवाडी येथील रस्त्यामधील बुध्दविहाराचे स्थलांतर, तसेच कॉमर्स झोन ते अग्रसेन हायस्कूल रस्ता अशा सर्व ठिकाणी आयुक्तांनी जागेवर जाऊन पाहणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.