Air Taxi News : देशात आता या मार्गावर धावणार एअर टॅक्सी

एमपीसी न्यूज : मकर संक्रांतीच्या दिवशी भारतीयांना एअर टॅक्सीच्या (Air Taxi) रुपात एक नवी भेट मिळाली आहे. देशातील पहिली एअर टॅक्सी सर्व्हिस चंडीगढ ते हरियाणातील हिसारसाठी सुरू करण्यात आली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी एअर टॅक्सी सर्व्हिसचा शुभारंभ केला.

एअर टॅक्सी सुरू झाल्याने आता हिसार (Hisar) ते चंडीगढपर्यंतचा (Chandigarh) प्रवास केवळ 50 मिनिटांत पूर्ण होऊ शकणार आहे. विशेष बाब म्हणजे, एअर टॅक्सीचं भाडं, रस्त्यावर चालणाऱ्या टॅक्सीप्रमाणेच असेल. चार सीटर एअर टॅक्सी विमानाचं हरियाणा ते चंडीगढपर्यंतचं भाडं प्रति व्यक्ती 1755 रुपये आहे.

एअर टॅक्सीमुळे वेळ आणि पैसे दोघांची बचत होणार आहे. एअर टॅक्सीतून प्रवास करताना चेक इनसाठी तासभर आधी जाण्याची गरज नाही. केवळ 10 मिनिटं आधी जाऊन एअर टॅक्सी विमानात सीट मिळवता येणार आहे.

सध्या केवळ हिसार ते चंडीगढसाठी एअर टॅक्सी सुरू करण्यात आली आहे. परंतु येणाऱ्या काळात देशातील वेगवेगळ्या 26 मार्गांवर एअर टॅक्सी सर्व्हिस सुरू केली जाणार आहे. एअर टॅक्सीचा दुसरा टप्पा 18 जानेवारी रोजी सुरू होईल. यावेळी हिसार ते डेहरादूनसाठी (Hisar to Dehradun) एअर टॅक्सी उड्डाण करेल.

तिसऱ्या टप्प्यात चंडीगढ ते डेहरादून (Chandigarh to Dehradun) आणि हिसार ते धर्मशालादरम्यान (Hisar to Dharamshala) एअर टॅक्सी सुरू केली जाणार आहे. त्यानंतर हरियाणा ते शिमला, कुल्लूसह इतर अनेक मार्गांवर Air Taxi सर्व्हिस सुरू केली जाईल.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.