Pune : 40 फुटांपेक्षा अधिक उंचीचे होर्डिंग काढून टाकणार ; महापालिकेचे सर्वेक्षण सुरू 

एमपीसी न्यूज – महापालिकेची मान्यता घेतल्यानंतर रस्त्याच्या कडेला चाळीस फुटांपेक्षा अधिक उंचीवर लावण्यात आलेल्या होर्डिंगचे सर्वेक्षण महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. ज्या होर्डिंग धारकांनी अशाप्रकारे उंची वाढवली आहे. त्यांची मान्यता रद्द करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून देण्यात आली आहे.

मंगळवार पेठ येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटनेत चार जणांचा बळी गेल्यानंतर खरबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, महापालिका आकाश चिन्ह आणि परवाना नियमावली 2003 नुसार 40 फुटापर्यंतच्या उंचीच्या होर्डिंगला परवानगी दिली जाते. ही उंची जमिनीपासून दहा फूट उंची नंतर मोजले जाते. त्याची मोजणी करून तसेच तपासणी करून पालिकेकडून या परवानग्या दिल्या जातात. मात्र, नंतर महापालिकेच्या परवानगीला हारताळ फासून होर्डींग्स धारकांकडून ही होर्डींग्सची उंची वाढवून नियमबाह्य उंची केली जाते.

मंगळवार पेठेतील होर्डींग्स अशाच प्रकारे 80 फूट उंचीचे होते. शहरात अनेक प्रमुख रस्त्यांवर नियम पायदळी तुडवून उभारलेले होर्डींग्स असून त्यामुळे पुन्हा अपघात होण्याचा धोका आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने तातडीने जमिनीवर 40 फुटांपेक्षा अधिक उंचीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या होर्डींग्सचे सर्वेक्षण हाती घेतली असून तातडीने काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.