Pune: कोरोनाचा रिपोर्ट लवकर देण्यासाठी प्रयत्न करू : डॉ. दीपक म्हैसेकर

'Will try to give corona reports as early as possible.'- Dr. Deepak Mhaisekar

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रिपोर्ट यायला उशीर होतो. मात्र, यापुढे तातडीने रिपोर्ट मिळविण्यासाठी सूचना करणार असल्याचे पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोरोनाचा समूह संसर्ग म्हणूनच आम्ही काम करीत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले. खाजगी लॅब चुकतात म्हणून कारवाईही केली आहे.

पुणे महापालिका क्षेत्रातही लवकरच कोरोनाचे रुग्ण कमी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनच्या काळात पुणे शहरात मोठ्या प्रमाणात टेस्ट वाढविण्यात आल्या आहेत. 23 जुलै नंतर लोकांना काहीही त्रास होणार नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी निक्षून सांगितले.

जवळपास 35 ते 40 आयसीयू बेडस वाढवितोय, रॅपिड टेस्टचा फायदा होतोय, टेस्ट वाढल्याने रुग्ण वाढत आहेत. रुग्णांसाठी कोविड सेंटरमध्ये  जागा उपलब्ध करून देत आहोत.

विमाननगरमध्ये 2 ते अडीच हजार नागरिकांच्या सोयीसाठी, ऍग्रीकल्चर कॉलेज, सीओईपी येथेही कोव्हीड सेंटर उभारू, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांनी दिली.

50 बेडस ससूनमध्ये उपलब्ध आहेत, 650 बेडस सध्या उपलब्ध आहेत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक, भारती हॉस्पिटलमधून रुग्ण बरे झाले आहेत, असे जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. दरम्यान, 23 जुलै रोजी लॉकडाऊन संपत असले तरी त्यानंतरही फीजिकल डिस्टन्स आणि मास्क लावावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.