Pune News: पसंती क्रमांक एकचे मत देऊन संग्राम देशमुख यांना विजयी करा

अमित गोरखे यांचे पदवीधरांना आवाहन

0

एमपीसी न्यूज – पुणे पदवीधर मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक मतदारसंघ आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तीन वेळा तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. पक्षाचा विचार आमच्यासाठी महत्वाचा असून, कुठल्याही परिस्थितीत विजय हा आमचाच होणार आहे, असा विश्वास व्यक्त करत पसंती क्रमांक एकचे मत देऊन उच्चशिक्षित उमेदवार संग्राम देशमुख यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करण्याचे आवाहन भाजपाचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांचे पदवीधरांना केले आहे.

उच्चशिक्षित व प्रशासकीय कामाचा तगडा अनुभव ही आमच्या उमेदवाराची खरी ओळख असल्याचे सांगत गोरखे म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघांमध्ये ताकत नसतानासुद्धा आम्ही अनेक निवडणुका जिंकलेल्या आहेत. पदवीधरांचे प्रश्न खऱ्या अर्थाने सभाग्रहात मांडण्याचे काम भाजपच्या तत्कालीन उमेदवारांनी केलेले आहे.  आता तर भारतीय जनता पक्षाची ताकत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातील नोंदणी ही खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीने केली आहे. त्याच्या जोरावर पंधरा ते वीस हजाराच्या मताधिक्क्याने आमचा विजय होईल असा विश्वासही गोरखे यांनी व्यक्त केला आहे.  ते म्हणाले, “या मतदारसंघात प्रकाश जावडेकर तसेच चंद्रकांत पाटील यांच्या काळात चांगले काम झाले आहे.  देशमुख यांनी सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. सहकार क्षेत्रात काम असल्याने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा संपर्क चांगला आहे. त्यांना प्रशासकीय कामाचा चांगला तगडा अनुभव आहे. सांगली जिल्हा परिषदेचे नाव त्यांनी अध्यक्ष असताना संपूर्ण देशभर व महाराष्ट्रभर जिल्हा परिषदेचे नाव लौकिक केले आहे.

सहकार क्षेत्राचा ही त्यांना तगडा अनुभव आहे, अशा उच्चशिक्षित उमेदवाराला जनता निश्चित संधी देणार आहे. त्या संधीचे सोने  देशमुख केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे पसंती क्रमांक एकचे मत देऊन संग्राम देशमुख यांना विजयी करा असे आवाहन गोरखे यांनी केले. त्याचबरोबर शिक्षक मतदार संघात सोलापूरचे उमेदवार जितेंद्र पवार यांना निवडून देण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी  शिक्षकांना केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III