Pimpri : शहरातील गुन्हेगारी व मुलींवरील अत्याचार थोपविण्यासाठी बुद्धीजीवींची संवेदना जागृती रॅली

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी व लहान मुलींवर झालेल्या अत्याचारा संदर्भात पिंपरी चिंचवड शहरातील बुद्धीजीवी वर्गाने संवेदना जागृती रॅलीचे आज आयोजन केले होते. यावेळी विविध संघटनांच्या वतीने पोलिस उपायुक्त ढाकणे यांना निवेदन देत या प्रश्‍नासंदर्भात शहरातील बुद्धीजीवी वर्ग आपल्या सोबत समाज प्रबोधनाच्या कार्यात सहभागी राहिल असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

माझे शहर, माझा अभिमान या अभियानामार्फत या संवेदना जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अभियान मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ‘पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात शहरातील बुद्धीवादी वर्ग चिंता व्यक्त करत आहे.  आज घट स्थापणेचा दिवस आहे. या दिवशी आपण नव्याने अंकुरीत झालेल्या सृष्टीची पूजा करत असतो. अशा नव्याने अंकुरणार्‍या सृष्टेचे पूजक असलेले आपण कोवळ्या कळ्यांना कसे कुस्करू शकतो हे आपल्या संस्कृतीला लांच्छनास्पद असून आपण ज्या संस्कृतीचे गोडवे गातो ती अशी अत्याचारी नाही.हा संदेश शहरातील सर्व घटकांपर्यंत जावा हा या संवेदना रॅलीचा मुख्य हेतू आहे. ही रॅली म्हणजे आंदोलन, निषेध, मोर्चा असे नसून शहरातील प्रत्येकाच्या संवेदना जागृत करण्यासाठीची मुक रॅली आहे. शहराच्या या गंभीर प्रश्‍नासंदर्भात पोलिसांना काही मदत हवी असेल तरी ती शहरातील एक सुज्ञ नागरिक म्हणुन करण्यास आम्ही तयार आहोत. हे माझे शहर आहे व या शहराचा मला अभिमान राहिल यासाठी आम्ही सर्वोतोपरी सहकार्यास तयार असल्याचे अभिवचन आपणांस देत आहोत.’

या रॅलीचे नेतृत्व अरुण कांबळे यांनी केले. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, माजी सहाय्यक आयुक्त अ‍ॅड. सुभाष माचुत्रे, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, पिंपरी चिंचवड सीटीझन फोरमचे हृषीकेश तपशाळीकर, लायन्स क्लबचे अनिल झोपे, मेघल स्पेस प्रा. लि. चे डायरेक्टर तुषार शिंदे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे बापूसाहेब गोरे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश हुंबे, अ‍ॅड. बाळकृष्ण रणपीसे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड, पिंपरी चिंचवड ओबीसी संघटनेचे अध्यक्ष आनंदा कुदळे, पिंपरी चिंचवड बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष प्रताप गुरव, सफल रिलिफ ट्रस्टचे भावेश दाणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केंद्रीय पदाधिकारी डॉ. गणेश अंबिके, डॉ. सरोज अंबिके, डॉ. पूजा शिंदे, आर्कीटेक्ट शेखर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विजय जगताप, प्रसाद पोतदार अ‍ॅड. रावसाहेब टिळेकर, उद्योजक अभय भोर, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय भुसारे आदी प्रमुख उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.