Chinchwad : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, हे कौतुकास्पद- डॉ. ई वायूनंदन

'जाणता राजा' या विषयावर महानाट्याचे सादरीकरण; 980 विद्यार्थ्यांचा समावेश

एमपीसी न्यूज -प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटमधील शिशूवर्ग ते पदवीत्तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सातत्याने विविध उपक्रमे राबवून त्याच्या कलागुणाचा विकास केला जात आहे. ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलपती डॉ. ई वायूनंदन यांनी केले.

चिंचवड येथील कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या प्रेरणेतून आणि मुख्याध्यापिका सविता ट्रव्हीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल आणि प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे 980 विद्यार्थ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनावर आधारीत ‘जाणता राजा’ या विषयावर महानाटय सादर केले.

पारंपारीक वेशभूषा, भव्य देखावा, घोडयावर स्वार होऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन, कसलेल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले अभिनय आणि शिवराज्याभिषेक सोहळा पाहून उपस्थित पालक वर्ग तसेच प्रचंड संख्येने असलेल्या जनसमुदायाने ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शिवराज्याभिषेक सोहळयाच्या वेळी फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.

चालु वर्षाच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात डॉ. ई. वायूनंदन यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय आणि राज्य पातळीवर मैदानी खेळ तसेच विविध स्पर्धेत यशस्वी खेळाडू, याचबरोबर इ. 10 वीत शाळेत प्रथम आलेली कु. नुपूर इंगवले (93.33) श्‍वेताक उपाध्याय (91.16) अथर्व काळे (90.33) टक्के गुण मिळविलेले विद्यार्थी, नितीन चौरसीया (आदर्श विद्यार्थी) आस्था अगरवाल (आदर्श विद्यार्थीनी) यांचा स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.

सामाजिक बांधिलकीची विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच जाणीव व्हावी. भविष्यात इतर गरजूना मदतीची भावना त्याच्यात निर्माण व्हावी, या जाणीवेतून त्यानी वर्षभरात केलेल्या कार्यक्रमातून जमा झालेल्या रकमेतून कॅन्सर पिडीतासाठी आणि जनसेवा फाऊंडेशनला प्रत्येकी 50 हजार रुपयाचा धनादेश वर्धमान जैन व सौ. सरिता सोनावणे यांना कुलपती डॉ. ई. वायूनंदन यांच्या हस्ते सुर्पूत करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावरती कमला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, सचिव डॉ. दीपक शहा, संचालिका भूपाली शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता ट्रव्हीस, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वनिता कुर्‍हाडे, डॉ. के. आर. पाटेकर, संचालक डॉ. सचिन बोरगांवे उपस्थित होते.

यावेळी सचिव डॉ. दीपक शहा प्रास्ताविकात म्हणाले, संस्थेतील मुलांचे शैक्षणिक विकासाबरोबर त्याच्या कलागुणाचा विकास मी महत्वाचा मानतो. आज ‘जाणता राजा’चे जनक बाबासाहेब पुरंदरे या कार्यक्रमाला आले असते मुलांचा अभिनय पाहून ते देखील भारावून गेले असते. मुलांच्या सुप्त कला गुणाचा विकास व्हावा, या हेतूने कार्यक्रम राबविण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.