Nigdi : आमदार लांडगे यांच्या प्रयत्नातून मदरशात पेविंग ब्लॉक बसवण्याच्या कामाला सुरुवात

एमपीसी न्यूज – अंकुश चौक निगडी येथे असलेल्या मदरशामध्ये पेविंग ब्लॉक बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे काम आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून केले जात आहे. काही दिवसांमध्ये संपूर्ण मदरशामध्ये पेविंग ब्लॉक बसवून पूर्ण होणार आहेत.

पेविंग ब्लॉकच्या कामाच्या शुभारंभवेळी मौलाना हनीफ शेख, इकबाल शेख, रशीद शेख, अमीर पठाण, रहीम कुरेशी, अब्दुल शेख, महेबूब बागवान, मुल्ला शेख, रफिकभाई खान, अमीन शेख आदी उपस्थित होते.

रहीम कुरेशी यांनी सांगितले की, निगडी येथील मदरशामध्ये परिसरातील अनेक मुस्लिम बांधव येत असतात. मदरशाकडे येण्याच्या मार्गावर चिखली होत असल्याने नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे मागील एक वर्षांपूवी निगडी येथील मदरशातील मंडळींनी स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधींकडे मदरशामध्ये पेविंग ब्लॉक बसवण्याची मागणी केली. मात्र, त्याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले होते.

मागील काही दिवसांपूर्वी मदरशातील पदाधिका-यांनी आमदार महेश लांडगे यांची भेट घेऊन पेविंग ब्लॉक बसवण्याची मागणी केली. आमदार लांडगे यांनी दलित सुधार निधी अंतर्गत मदरशामध्ये पेविंग ब्लॉक बसवून देण्यासाठी संमती दिली. त्याची तात्काळ अंमलबजावणी होऊन या कामाचा आरंभ देखील करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होणार आहे, असेही कुरेशी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.