Osmanabad News : तहसीलदारांच्या पुढाकाराने प्रलंबित शेतरस्त्याचे काम मार्गी

तहसीलदार सौदागर तांदळे स्वतः बांधावर

एमपीसी न्यूज : तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या वादातून प्रलंबित असणाऱ्या शेत रस्त्याचे काम तहसीलदार यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आले आहे.

यावेळी तहसीलदार तांदळे म्हणाले की तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे हाल रस्ता नसल्याने होतात त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी अडचण निर्माण होते. तालुक्यातील अनेक प्रलंबित शेत रस्त्याचे  काम आपण स्वतः लक्ष घालून लवकरच मार्गी लावणार आहे. यापुढे शेत रस्त्याच्या क्षेत्रासाठी कुठल्याही शेतकऱ्यांची अडवणूक होता कामा नये यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील.

शेत रस्त्याच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांना आपण विशेष  प्रेझेन्टेशन दिले असून लवकरच शेतकऱ्यांचे शेत रस्त्याचे  प्रश्न सुटतील. यावेळेस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य धीरज पाटील, पत्रकार सचिन ताकमोघे, शेतकरी आकाश गंधारे, आबासाहेब कापसे,अनिकेत जाधव बिबीशन गंधारे, सौदागर गंधारे,अक्षय कापसे, पिंटू घाटशिळे,अंकुश गणेश, लांडगे, धनाजी धनके, अभिमान जाधव, रवि धनके, सोमनाथ धनके, बाळासाहेब घाटशिळे, आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.