Pune : नामांकित शैक्षणिक संस्था आल्याने भोसरी परिसराला शैक्षणिक हब म्हणून ओळख – आमदार महेश लांडगे

एमपीसी न्यूज –  पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्था भोसरी परिसरात आल्याने भोसरी परिसराला शैक्षणिक हब म्हणून नवीन ओळख मिळत आहे. असे भाजप-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम संघटना-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “भोसरी आणि आसपासच्या परिसरातून विद्यार्थी शिक्षणासाठी पुणे शहरात जातात. दररोज कित्येक किलोमीटरचा प्रवास करण्यात विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो. त्यामुळे पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांची एक बैठक आयोजित करून त्यांना भोसरी परिसरात शैक्षणिक संस्था सुरू करण्यास सांगितले. त्यासाठी संस्थांनी देखील होकार दिला असून नजीकच्या काळात सर्व नामांकित शैक्षणिक संस्था भोसरी आणि आसपासच्या परिसरात येणार आहेत.

मोशी, दिघी, च-होली, चिखली या परिसरातील सुमारे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी पुणे शहरात जातात. यामुळे त्यांचा वेळ वाया जातो. पुण्यातील त्याच नामांकित शैक्षणिक संस्था प्राधिकरण परिसरात आल्याने विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली. विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होऊ लागली. विद्यार्थ्यांना जवळच्या परिसरात दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था होणार असून प्राधिकरण परिसराला शैक्षणिक हब अशी देखील ओळख मिळणार असल्याचे आमदार महेश लांडगे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.