Pimpri : युवाशक्तीच्या पाठिंब्यामुळे गौतम चाबुकस्वार यांचा विजय निश्चित – प्रतीक्षा घुले

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांना प्रचंड बहूमतांनी निवडून देण्याचा निर्धार युवासैनिकांनी केला. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची तरुण वर्गामध्ये क्रेझ आहे. युवाशक्तीच्या पाठिंब्यामुळे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा विजय निश्चित असे युवती अधिकारी प्रतीक्षा घुले यांनी म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

युवासेना पिंपरी विधानसभातर्फे आज (गुरुवारी) प्रभागनिहाय बैठका घेण्यात आल्या. बोपखेल -कासारवाडी -फुगेवाडी – -मोहननगरला बैठका पार पडल्या. महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांना प्रचंड बहूमतांनी निवडून देण्याचा निर्धार युवासैनिकांना केला. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे तरुण वर्गामध्ये जास्त आकर्षण आहे.

चाबुकस्वार यांच्या कार्यचा लेखाजोखा तळगाळातील सर्वसामान्य नागरिकांना पर्यंत पोहचविणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. यावेळी युवतीअधिकारी प्रतीक्षा घुले, नगरसेविका मीनल यादव, रवींद्र कोवे, किरण रोकडे , नामदेव घुले, एकनाथ हाके, प्रमोद शिंदे, चंद्रकांत शिंदे, विकास गायकवाड, रवी नगरकर,सनी कड, अजय कुमार,  सोन्या लांडे, विनय खमगळ, ओंकार जगदाळे, दीपा गुरव, प्रतीक्षा लोयरे,  अनुजा घुले, सचिन कोष्टी उपस्थित होते.  बैठकीचे नियोजन विभागसंघटक निलेश हाके यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.