Wakad Crime News : गांजा विक्री प्रकरणी महिलेला अटक; साडेचार किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेला अटक केली आहे. तिच्या ताब्यातून चार किलो 570 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 2) दुपारी एक वाजता कावेरीनगर भाजी मंडईजवळ करण्यात आली.

सुरेखा संतोष सुकळे (वय 35, रा. कावेरीनगर भाजी मंडई जवळ, झोपडपट्टी वाकड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक संदीप पाटील यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Ganja Seller arrested : घरातच ‘गांजा’चे दुकान थाटणाऱ्या बहाद्दराला अटक, 21 किलो गांजा जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कावेरीनगर भाजी मंडई जवळ रस्त्याच्या कडेला एक महिला गांजा विकत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. सुरेखा सुकळे ही महिला गांजा विकत होती. पोलिसांनी तिच्याकडून एक लाख 14 हजार 250 रुपयांचं चार किलो 570 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.