Dighi : झाडे तोडण्यास रोखल्याने महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज – शेताच्या बांधावरील झाडे तोडू नका, असे म्हटल्याने तीन जणांनी महिलेला मारहाण केली. ही घटना 21 ऑगस्ट रोजी दुपारी दिघी येथे घडली.

संतोष महादु सातव (वय 45, रा. देहू-आळंदी रोड, च-होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सोमनाथ तानाजी तळेकर, तानाजी तळेकर व गणेश तळेकर (सर्व रा. च-होली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष यांच्या पत्नी शेतामध्ये कांदे निवडत होत्या. त्यावेळी आरोपी यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेताच्या बांधावरील झाडे तोडण्यास सुरूवात केली. संतोष यांच्या पत्नी यांनी झाडे तोडू नका असे म्हटले. याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत काठीने मारून जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.