Hinjawadi : घरात घुसून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – जबरदस्तीने घरात घुसून महिलेशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना कासारसाई येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

आकाश उर्फ आशिष बाळासाहेब वाघचौरे (रा. कळसगाव, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 29 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 ऑगस्ट रोजी फिर्यादी महिला घरात एकट्याच होत्या. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आरोपी त्यांच्या घरात जबरदस्तीने घुसला. त्याने फिर्यादी महिलेशी अश्लील वर्तन करत त्यांचा विनयभंग केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.