Pune : मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाने महिलेची 2.5 लाखांना फसवणूक

एमपीसी न्यूज – मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाने एका महिलेची अडीच लाखांना फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका 54 वर्षीय महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका अज्ञात मोबाइलधारक इसमाने आणि महिलेने फोन करून फिर्यादी यांच्या मालकीच्या पुरंदर येथील एक गुंठा जागेवर मोबाईल टॉवर बसविण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडे वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये वसूल केले. मात्र, त्यांच्या जागेवर मोबाइल टॉवर न बसवता त्यांची फसवणूक केली.

याप्रकरणी अज्ञात मोबाइलधारक इसम व महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लष्कर पोलीस पुढील तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.