Crime News : बनावट शिक्के आणि सहीद्वारे महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज – बनावट शिक्के आणि सहीद्वारे एका महिलेने दुस-या महिलेची फसवणूक केली.हा प्रकार 8 ऑगस्ट रोजी एलआयजी कॉलनी, प्राधिकरण निगडी येथे घडला.याबाबत फसवणूक झालेल्या महिलेने दुस-या महिलेविरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी महिलेने तिच्या घरात असलेल्या ऑफिसमध्ये बनावट नोटरी केली. त्यावर आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या पदाचा खोटा शिक्का आणि बनावट सही केली. आरोपीला नोटरीचा कोणताही अधिकार नसताना तिने नोटरी करून फिर्यादीची आणि शासनाची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.