Nigdi Police : लग्नाचे आमिष दाखवून महिलेची लाखोंची फसवणूक

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून तरुणी कडून 10 तोळे सोने व पाच लाख रुपये घेत ल्गन करता तिची फसवणूक केली आहे. हा प्रकार 2010 ते 16 मे 2023 या कालावधीत घडला आहे.
याप्रकरणी पीडितेने निगडी पोलीस (Nigdi Police) ठाण्यात बुधवारी (दि.17) फिर्याद दिली असून गोपाल श्रीराम इंगळे (वय 38 रा रुपीनगर, तळवडे) याला पोलिसांनी अटक केली आहे.
Shikrapur Chakan : शिक्रापूर-चाकण रोडवरून 3 हजार किलो गोमांस जप्त, दोघांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. पुढे आरोपीने फिर्यादिकडून 10 तोळे सोने, 5 लाख रुपये, तसेच फिर्यादीच्या दुचाकी विक्रीचे 25 हजार रुपये घेतले. पीडीतेशी शारीरिक संबंध तिचे पैस परत न करता फिर्यादीला लग्नाला नकार दिला यावरून आरोपीला पोलिसांनी अटक केली असून (Nigdi Police) पोलीस पुढील तपास करत आहेत.