Nigdi News : व्यवसायात भागीदार करून घेण्याच्या बहाण्याने महिलेची 25 लाखांची फसवणूक

 एमपीसी न्यूज – वॉटर प्युरिफायरच्या व्यवसायात भागीदार करून घेण्याच्या बहाण्याने एका महिलेकडून 25 लाख रुपये घेतले. मात्र महिलेला भागीदार करून न घेता तसेच घेतलेले पैसे परत न देता महिलेची फसवणूक केली. हा प्रकार 22 फेब्रुवारी 2020 ते 27 फेब्रुवारी 2021 या कालावधीत बिग व्हिजन आरओ वॉटर प्युरिफायर, प्राधिकरण निगडी येथे घडली.

चंद्रकांत महादेव मोरे (वय 55, रा. प्राधिकरण निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मोनिका ओमप्रकाश अग्रवाल (वय 35, रा. कल्याण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोरे हा बिग व्हिजन आरओ वॉटर प्युरिफायर या कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर आहे. त्याने फिर्यादी महिलेला त्याच्या व्यवसायात भागीदार म्हणून घेण्याचे अमिश दाखवले. तसेच महिलेकडून त्यापोटी 25 लाख रुपये घेतले. पैसे घेऊन महिलेला व्यवसायात भागीदार करून घेतले नाही. तसेच घेतलेले पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.