Indigo Airline : इंडिगो एअर लाईन मध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज – इंडिगो एअरलाइन्स (Indigo Airlines) या विमान कंपनीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने एका महिलेची 11 हजार 500 रुपयांची आर्थिक फसवणूक (fraud) केली. ही घटना 29 सप्टेंबर 2020 ते 1 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडली.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार  9478317830 व  9718745975, एक महिला आणि फेडरल बँक अकाउंट धारक अनिलकुमार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ghoravadeshwar : घोरावडेश्वर डोंगरावरील वनमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओएलएक्स या अॅपच्या माध्यमातून आरोपीने फिर्यादींना संपर्क केला. फिर्यादींना इंडिगो एअरलाईन या कंपनीत नोकरी लावण्याचे त्याने आमिष दाखवले. इंडिगो एअरलाईन कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे हरवलेले आयडी कार्ड आरोपीला सापडले असल्याने त्याने ते दाखवून फिर्यादींचा विश्वास संपादन केला. नोकरी लावण्यासाठी फिर्यादीकडून 11 हजार 500 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.