Pune : फेसबुकवरून मैत्रिकरून महिलेची 51 हजार रुपयांना फसवणूक

एमपीसी न्यूज – फेसबुकवरून मैत्रिकरून एका इसमाने महिलेची 51 हजार रुपयांना फसवणूक केली. याप्रकरणी कोथरूड येथील एका 48 वर्षीय महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिले सोबत आरोपीने फेसबुकवरून मैत्रि केली. त्यानंतर त्यांचा व्हॉट्स अप क्रमांक मिळवून व्हॉट्स अप वर चॅटकरून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्यासाठी गिफ्ट पाठविले असून तो स्वतः भारतात आला आहे. मात्र विमानतळावर कस्टम विभागाकडून हे गिफ्ट अडविण्यात आले आहे. त्यामुळे ते सोडविण्यासाठी एकदा 30 हजार आणि एकदा 21 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे महिलेने ते पैसे मोबाईलवरून ट्रान्सफर केले. मात्र, नंतर संपर्क न झाल्याने महिलेची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.अलंकार पोलीस पुढील तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.