Wakad : आजारपणाला कंटाळून काळेवाडीत महिलेची आत्महत्या ?

एमपीसी न्यूज – महिलेने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 22) दुपारी साडेबाराच्या सुमारास काळेवाडी येथे उघडकीस आली आहे. मागील काही दिवसांपासून त्या आजारी असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

कोमल दीपक नाथपुतणी (वय 42, रा. ज्योतिबा मंगल कार्यालयासमोर, काळेवाडी), असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास अंघोळ करण्याच्या बहाण्याने घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत जाऊन गळफास घेतला. बराच वेळ आई खाली आली नसल्याने मुलाने वर जाऊन पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कोमल मागील काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारही सुरु होते. कोमल यांचे पती दीपक टेलर असून त्यांचे पिंपरी येथे दुकान आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.