Bhosari : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; सासरच्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 10) रात्री भोसरी एमआयडीसी येथे घडली. याबाबत सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर बाबू शेख (वय 23), शकिरा बाबू शेख (वय 40), बाबू मुसा शेख (वय 50), अमीना मेहमुद्दीन शेख (वय 65, सर्व रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नाझिया समीर शेख (वय 19) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी शेख मदिना इफरोश (वय 42, रा. उपळी, ता. वडवणी, जि. बीड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांची मयत मुलगी नाझिया यांना माहेरहून फ्लॅट घेण्यासाठी दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच किरकोळ कारणांवरून वेळोवेळी जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिला. मारहाण करून उपाशी पोटी ठेवले. या त्रासाला कंटाळून त्यांनी मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास राहत्या घरी छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.