Bhosari : इलेक्ट्रिक शॉक लागून महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पाण्याची मोटार चालू करताना इलेक्ट्रिक शॉक लागून 24 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना आज (सोमवारी) पहाटे सहाच्या सुमारास लांडेवाडी येथे घडली.

भाग्यश्री योगेश जाधव (वय 24, रा. लांडेवाडी, भोसरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री लांडेवाडी येथे राहतात. मागील चार वर्षांपूर्वी त्यांचा योगेश जाधव यांच्याशी विवाह झाला. आज पहाटे पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी त्या गेल्या असता त्यांना इलेक्ट्रिक शॉक लागला. त्यांना तात्काळ पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.