Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जाणा-या महिलेला टेम्पोची जोरदार धडक बसली. यामध्ये महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 12) मध्यरात्री घडली. 

संगीता विठ्ठल सूर्यवंशी (वय 40, रा. चकरी, ता. हदगाव, जि. नांदेड), असे टेम्पोच्या धडकेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेली महिला वेडसर आहे. ती रविवारी रात्री चाकण चौकाजवळ पुण्याकडे जाणा-या रोडवरून पायी जात होती. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या टेम्पो चालकाने महिलेला धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेतील टेम्पोचालक घटनास्थळी न थांबता, पोलिसांना घटनेची खबर न देता पळून गेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.