Sangavi : पेंटींग कंपनीत गुंतवणूकीचे आमिष दाखवून महिलेची सात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पेंटिंग कंपनीत गुंतवणुक (Sangavi ) करा कंपनीकडून 4 टक्के परतावा मिळेल असे आमिष दाखवून महिलेची तब्बल 7 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार सांगवी येथे ऑनलाईन पद्धतीने 2017 पासून आजपर्यंत घडला आहे.

याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून नितीन ज्ञानदेव येवले (वय 40) अमित किशोर बांगर (वय 40 रा. पिंपळे सौदागर) याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Chakan : शेतात काम करणाऱ्या महिलेशी गैरवर्तन केल्या प्रकरणी एकावर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीं नितीन याच्या युनायटेड कलर कंपनी या पेंटिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास प्रतिमहिना 4 टक्के परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी यांनी वेळोवेळी असे 7 लाख रुपये गुंतवले. याचा कोणताही परतावा आरोपींनी फिर्यादीला दिला नाही. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला (Sangavi ) असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.