Dighi : पायी जाणा-या महिलेला दुचाकीची धडक; महिला जखमी

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेला दुचाकीस्वाराने धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात गुरुवारी (दि. 27) सकाळी नऊच्या सुमारास आळंदी पुणे रस्त्यावर साई बाबा मंदिरासमोर झाला.

सुलोचना राधाकृष्ण गोपेकर (वय 52, रा. वडमुखवाडी, च-होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात मोटारसायकलस्वराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपेकर एमआयडीसी भोसरी मधील एका कंपनीमध्ये काम करतात गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास त्या कामावर जाण्यासाठी निघाल्या. आळंदी पुणे रोडवरील साईबाबा मंदिरासमोर असलेल्या बस स्टॉप येत असताना भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. दरम्यान दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.