Hijanwadi : जाब विचारणा-या महिलेला बाप-लेकाची मारहाण

एमपीसी न्यूज – पुतण्याला केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला बाप-लेकाने शिविगाळ करत डोक्यात बांबूने मारहाण करून गंभीर जखमी केले. हा प्रकार हिंजवडीतील साखरे वस्ती येथे गुरूवारी रात्री सव्वाआठ वाजता घडला. 

लक्ष्मी सरसय्या गोडी (वय 35, रा. विकास थोपटे बिल्डींग, साखरेवस्ती, हिंजवडी) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यानुसार विकास अनिल जाधव (वय 27), अनिल किसन जाधव (वय-54, रा. शिवनाथ जांभुळकर बिल्डींग साखरेवस्ती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी यांच्या पुतण्याला आरोपी बाप-लेकाने मारहाण केली होती. याचा जाब विचारण्यासाठी लक्ष्मी गुरूवारी रात्री गेल्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत विकासने त्यांच्या डोक्यात लाकडी बांबूने मारहाण करून गंभीर जखमी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक देवताळे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.