Pune News : स्वारगेट परिसरात दुचाकीला डंपरची धडक, महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज : स्वारगेट परिसरातील उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. भारती अनंत शिर्के (वय 55, पर्वती दर्शन इंदिरा मिनी मार्केट जवळ पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी मयूरी सुनील तिके (वय 26) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात डंपर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी या भारती शिर्के यांच्यासोबत स्वारगेट चौकातून सातारा रस्त्यावरील स्वारगेट एसटी स्टँड च्या समोर असणाऱ्या प्रवेश गेट समोरून जात असताना भरधाव वेगातील डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

त्यामुळे भारती शिर्के या खाली पडल्याने त्यांना जबर दुखापत झाली आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी अनोळखी डंपर चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.