Bhosari Crime News : जागेच्या वादातून झालेल्या भांडणात महिलेचा विनयभंग 

एमपीसी न्यूज – जागे संबधावरुन झालेल्या वादात महिलेचा विनयभंग झाल्याची फिर्याद भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. हि घटना शुक्रवारी (दि.15) रात्री दहाच्या सुमारास भोसरी परिसरात घडली. 

याप्रकरणी 35 वर्षीय महिलेनं भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश गुलाब काटे (वय 42, रा. दापोडी), राजेंद्र गुलाब काटे (वय 50, रा. सांगवी), अक्षय राजेंद्र काटे (वय 25, रा. सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जागेच्या वादातून आरोपींनी फिर्यादी महिलेच्या पतीला शिवीगाळ केली. फिर्यादी याठिकाणी गेल्या असता त्यांना अक्षय काटे या आरोपीने मागून धक्का देऊन खाली पाडले. महिला खाली कोसळल्यानंतर आरोपी महेश काटे याने ‘तुझी आता इज्जत काढतो’ असे म्हणत, फिर्यादी महिलेचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिखरे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.