Nigdi News : प्रॉपर्टीच्या वादातून महिलेचा विनयभंग, तिघांवर गुन्हा 

एमपीसी न्यूज – प्रॉपर्टीच्या वादातून महिलेचा विनयभंग करणा-या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यमुनानगर, निगडी याठिकाणी गुरुवारी (दि.02) हा प्रकार उघडकीस आला. 

सदाशिव आकार्शे (वय 65), प्रशांत सदाशिव आकार्शे (वय 35) व एक महिला (सर्व रा. खळद, पुरंदर) या तीन जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडित महिलेनं शुक्रवारी (दि.03) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रॉपर्टीच्या वादातून महिलेच्या घरात घुसले. आरोपी सदाशिव याने फिर्यादी यांच्या मैत्रीणीचा हात धरून जवळ ओढले आणि ढकलून दिले. आरोपी प्रशांत याने फिर्यादी यांचा ड्रेस ओढून विनयभंग केला तसेच दोघींना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.